मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : “मुक्ताईनगर मतदारसंघाच्या रोहिणीताई खडसे या निश्चितच भावी आमदार असून त्यांच्यात वाघिणीची चपळाई असून नाथाभाऊंप्रमाणे जनसामान्यांसाठी काम करण्याची तत्परता त्यांच्यात आहे. नाथाभाऊ राज्यातील एकमेव जनसामान्यांचा नेता असा आहे, की कोणी केव्हाही कॉल करा २४ तास भाऊ उपलब्ध असतात.काम करण्याची तीच पद्धत रोहिणीताईंची आहे.गेल्या निवडणुकीत पराभूत होऊनही केवळ माझ्या मतदाराच्या समस्या त्याच्या दारात जाऊन समजून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी आयोजित केलेली संवाद यात्रा ही राज्यासाठी प्रेरणादायी आहे.या यात्रेतून राष्ट्रवादी काँग्रेसची सभासद संख्या वाढवून मा.पवार साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी नाथाभाऊ व रा कॉ जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मतदार संघातील सारे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून घड्याळाची टिक टिक घराघरात पोहचवत आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मुक्ताईनगरला येऊन जनहिताची कोणतीच घोषणा केली नाही, फक्त पोकळ आश्वासने देऊन मतदारसंघ वाशियांच्या तोंडाला पाने पुसली म्हणून मुख्यमंत्र्याचा निषेध केला पाहिजे” असे प्रतिपादन किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी केले. संवाद यात्रेच्या १७ व्या दिवशी गाते आणि वाघोदा बुद्रुक या गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
या प्रसंगी विशाल महाराज खोले यांनी त्यांच्या दमदार भाषणातून सांगितले की, नाथाभाऊ ग्रेट लीडर कसे आहेत हे सांगताना मतदार संघातील अनेकविध विकासकामांचा उहापोह केला. पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार साहेब जाणता नेता असल्याचे सांगून यापुढे त्यांचे हात मजबूत करण्यासाठी रोहिणीताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रोहिणीताई यांनीही भारदस्त वक्तव्यातून मतदार संघात गेल्या तिन वर्षात वाढलेल्या गुंडगिरी वर संताप व्यक्त केला. संवाद यात्रेत गावागावतील महिला माझ्याजवळ येऊन गेल्या तीन वर्षात गावात दारू विक्री खूप वाढली असून अनेकांचे संसार उध्वस्त होत असून दारू विक्री बंद करण्याबाबतची एकमेव मागणी करत असल्याचे सांगितले.याशिवाय त्यांनी नाथाभाऊनी केलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख केला.
यावेळी यात्रा प्रमुख निवृत्तीभाऊ पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु.डी पाटील सर,विशाल महाराज खोले,जि प सदस्य कैलासभाऊ सरोदे, रामदास पाटील ,पंकज येवले,प स सदस्य दिपकभाऊ पाटील ,किशोर भाऊ चौधरी,योगिता ताई वानखेडे,रामभाऊ पाटील,सुनिल कोंडे, माया ताई बारी,भरत अप्पा पाटील, अतुल पाटील,प्रदिप बडगुजर,मेहमूद शेख,वाय डी पाटील,गजानन लोखंडे,शशांक पाटील,श्रीकांत चौधरी,योगेश्वर कोळी,सिद्धार्थ तायडे,शाहिद खान,हकीम बागवान,शकील सर, अमिन खान,गोपाळ गंगतिरे,रवींद्र पाटील,किशोर पाटील सोनू पाटील, सचिन महाले,डिगंबर चौधरी, ललित कोळंबे,अतुल पाटील,सोनु पाटील, राजेंद्र चौधरी,, नितीन पाटील,,केतन पाटील,वासुदेव चौधरी,केतन पाटील, सुनिल राऊत, उज्ज्वल पाटील,प्रदिप साळुंखे, नंदकिशोर हिरोळे,बाळाभाऊ भालशंकर,चेतन राजपुत,विशाल रोटे,अजय आढायके,भूषण कोळी,शुभम मुर्हेकर, रोहन च-हाटे,या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांच्यासोबत गाते येथील गणेश पाटील, विलास चौधरी, आकाश कोळी, योगेश तायडे,संतोष कोळी, सुखदेव तायडे, संतोष पाटील, प्रविण पाटील, प्रभाकर तायडे, गजेंद्र कोळी, भोजराज पाटील, शांता बाई पाटील, सुनंदाताई इंगळे,आशा ताई तायडे, प्रतिभाताई गातेकर,ज्योती ताई झालटे,सुरेखाताई कोळी आणि वाघोदा बुद्रुक येथील सरपंच राजु तडवी सर,कालूदादा मिस्त्री, भरत भाऊ सुपे, शाकीर टेलर,नितीन सुपे,कुंदन सुपे, उत्तम वाघ, रियाज भाई,विलास वाघ, अमिना बाई तडवी, अख्तर खान, बाळू भाऊ महाजन, उत्तम वाघ, नरेंद्र वाघ, शंकर बोदडे, मनोज वाघ, आकाश वाघ, मनोहर झालटे, अमोल वाघ, करन तायडे, कुंदन वाघ, दिपक झालटे, मनोहर वाघ, नकुल वाघ, अजय तायडे, महेंद्र वाघ, गौतम वाघ, अशोक वाघ आदी सह असंख्य नागरिक उपस्थित होते.







