नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : नागपूर ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत येणाऱ्या खापरखेडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत प्रीती बलदेव अहिरकर (वय ३१ वर्षे रा क्वार्टर नं १८५/१, प्रकाशनगर, खापरखेडा) या महिला पोलीस कर्मचाऱ्याने घटस्फोट व पतीने केलेले दुसरे लग्न च्या नैराश्येतून आपल्या राहत्या क्वार्टर मध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि.२५) दुपारी २ दरम्यान घडली असून वेळीच मदतीचे सहकार्य मिळाल्याने तिचे प्राण वाचले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी महिला पोलिस कर्मचारी ही पतीशी झालेला घटस्फोट व त्यानंतर पतीने केलेले दुसरे लग्न या नैराश्येतून नेहमी मानसिक तणावात असायच्या याच मानसिक तणावातून आज दुपारी जेवणाच्या वेळी २ दरम्यान पोलीस स्टेशन मधुन राहत्या क्वार्टर मध्ये जेवण करण्यासाठी गेल्या असता मानसिक तणावातून घरात ठेवलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
मात्र वेळीच हा प्रकार त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आल्याने, त्यांनी मदतीसाठी धाव घेतली व उपचारार्थ कामठीच्या आशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नवीन कामठी पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.






