कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज ता,28 रोजी कोरोची गावातील दिव्यांग बांधवानी प्रहार अपंग क्रांती संघटना जि कोल्हापुर शहर विभाग प्रमुख इचल शहराध्यक्ष सुनिल पाटील, अनिल विजयनगरे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग शिष्टमंडळने कोरोची ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच आण्णा लोहार यांना निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी ५% निधी आणि ५०% घरफाळा सवलत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास अचानक आंदोलनाचा इशारा दिला.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकते बिराजदार जॉबर,गणी मुल्ला, कोरोची अध्यक्ष श्रीहरी काकडे, गणेश वासुदेव,मड़के,प्रहार खजिदार गणेश शिंदे, कार्यध्यक्ष सुनिल माळी,महिला दिव्यांग मंगल उपाध्ये,संगिता पाटील, मंगल तोड़कर, उपस्थित होते.