अंतुर्ली परिसरात जनसंवाद यात्रेचे फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत

jansanwad-yatra

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : सन १९९० पासून आदरणीय नाथाभाऊ मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील जनसामान्याच्या गळ्यातील ताईत बनून राहिले. गेल्या ३० – ३५ वर्षात जनतेकडून त्यांना भरभरून प्रेम मिळालं त्यामुळेच, “मी खूप भाग्यवान आहे “असं नाथाभाऊ आवर्जून सांगतात.कोणत्याही प्रकारच्या जाती पातीचं राजकारण न करता फक्त मतदार संघाचा विकास हा एकच ध्यास घेऊन आजही ते काम करीत आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन मी सुद्धा भविष्य कालखंडात जनसामान्यांच्या सेवेसाठी कटीबद्ध राहील असा निर्धार रोहिणीताई खडसे यांनी आजच्या संवाद यात्रे दरम्यान सभेत ग्रामस्थांशी संवाद साधताना केल्याचे सांगितले.या संवाद यात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनापासून जन संवाद यात्रेचा शुभारंभ झाला आहे. गावागावात ढोल ताशे व फटाक्यांच्या अतिशबाजीत ठिकठिकाणी सुवासिनीकडून औक्षण करून रोहिणी खडसेचे स्वागत केले जात आहे.

 

rohinitai-khadseयाप्रसंगी, रोहिणी खडसे या गावागावातील वैयक्तिक व सामूहिक समस्या ऐकून घेत आहेत. कार्यक्रमा दरम्यान नाथाभाऊनी गेल्या ३०-३५ वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा सुद्धा ग्रामस्थांसमोर मांडत आहे. आजच्या संवाद यात्रेप्रसंगी प्राधान्यक्रमाने रावेर तालुक्याला अगदी जवळच्या मार्गाने जोडणारा निंभोरासीम -पिंप्री नांदू पूल ही अंतुर्ली परिसरासाठी फार मोठी उपलबद्धी असल्याचे स्पष्ट केले.याशिवाय नाथाभाऊंच्या दूरदृष्टीने उभारलेला खामखेडा पूल सुद्धा अंतुर्ली परिसरासाठी खूप महत्वाचा ठरला आहे.शासकीय कामकाजासाठी नागरिकांना मुक्ताईनगरला येण्या- जाण्यासाठीचा फेरा कमी झाल्याने वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होत आहे, या पुलांसह बोदवड तालुका निर्मिती, मुक्ताईनगर नामकरण सोहळा आदी ऐतिहासिक कामांची इतिहासाला नोंद घ्यावीच लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.

 

याआधी विनोदभाऊ तराळ, सोपान पाटील, यु डी पाटील, ईश्वर रहाणे आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. प्रसंगी सोपान पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,देशातील लोकशाही संपवण्याचे आणि संविधानाची पायमल्ली करण्याचे पाप केंद्रातील सरकार करत असून जन सामान्य लोकांच्या प्रश्नांकडे पाहायला त्यांना वेळ नाही.महागाईने प्रचंड डोके वर काढले असून लाखो सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही. काँग्रेसने 70 वर्षात जे कमवले ते-ते सर्व विकण्याचं महापाप मोदी सरकार करत आहे.मोठया प्रमाणात सत्तेचा गैरवापर करून कोट्यावधीचा चुराडा करून आमदार विकत घेऊन राज्या- राज्यात सत्ता काबीज करण्याची कुटील नीती सुरु असून आता प्रत्येक नागरिक निवडणुकांची वाट पाहत आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा रोष मतपेट्यातुन प्रकट होईल. नाथाभाऊंच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करीत असलेल्या रोहिणीताई खडसे गेल्या निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभूत होऊनही समस्या जाणून घेण्याच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण मतदार संघात केलेल्या संवाद यात्रेला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे, त्याच आपल्या भावी आमदार असतील असा विश्वास सोपान पाटील यांनी व्यक्त केला.

 

राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या विसाव्या दिवशी रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बेलखेड, भोकरी, धामणदे, नरवेल येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस तथा यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,माजी सभापती विलास भाऊ धायडे, किशोर चौधरी, प्रदिप साळुंखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय सोनार, rohinitaiतालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, सुधिर तराळ,सोपान दुट्टे, माफदा अध्यक्ष रामभाऊ पाटील,मुळाभाऊ पाटील, भाऊलाल पाटील सर,गणेश भाऊ तराळ,सुनिल दादा पाटील,शाहिद भाई खान,, बाळाभाऊ भालशंकर,बसरत खान,कुलदीप महाजन, अलकेश कासोदे, कैलास दूट्टे,व्हि एम पाटील, बबलू मेढे, फकिरा दवंगे,विलास नाना पाटील, संदिप ठोंबरे, नरेंद्र पाटील, प्रदिप पाटील, स्वप्निल पाटील, बाळू चौधरी, निळकंठ चौधरी,हर्षल कापसे, निवृत्ती पाटील,सलिम इनामदार,नरेंद्र पाटील,जहीर खान,सौरव सपकाळ,चेतन राजपुत, विशाल रोटे, शुभम दुट्टे,सारंग पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांसह बेलखेड येथील भास्कर पाटील, सुरेश पाटील,प्रदिप पाटील, कल्पेश पाटील, स्वप्निल पाटील, विकास पाटील, विशाल पाटील, साहेबराव पाटील, रवींद्र पाटील, चुडामन पाटील, मनोज पाटील, राहुल पाटील, शालीक पाटील, मयुर पाटील, धनराज पाटील, प्रल्हाद पाटील, संतोष पाटील, रवींद्र पाटील, सुनिल पाटील, गणेश पाटील, अशोक पाटील, विनोद पाटील, पंकज पाटील, शालीक पाटील, रमेश पाटील,किशोर पाटील प्रविण गायकवाड, किशोर गायकवाड, संदिप गायकवाड, प्रशांत पाटील, चेतन पाटील, किरण पाटील, धामणदे येथील भाऊराव पाटील सर,नरेंद्र पाटील,गोकुळ पाटील, निलेश पाटील, गणेश पाटील, विनोद गायकवाड, संतोष गायकवाड भगवान गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, धनराज पाटील, आत्माराम पाटील, राजू गायकवाड, कडू भाऊ पाटील, गोविंदा पाटील, गुलाब गायकवाड, जनार्धन गायकवाड,माधव गायकवाड, हरिभाऊ पाटील,भगवान पाटील, गोलू पाटील, भोकरी येथील बाळू भाऊ चौधरी, प्रविण पाटील,प्रकाश पाटील, गोकुळ चौधरी, पंकज पाटील, हरिष पाटील, अरविंद पाटील, समाधान पाटील, महेंद्र पाटील, अनिल अटकाळे, फकिरा सावकारे, हर्षल पाटील,अतुल कोळी, गुलाबराव पाटील ,नामदेव पाटील, महेंद्रपाटील, बाळू पाटील, राहुल पाटील, गोपाळ चौधरी, रवींद्र पाटील, मुरलीधर कोळी,योगेश पाटील, रघुनाथ पाटील, देवानंद पाटील, लिलाधर चौधरी, किशोर पाटील,युवराज चौधरी, संजय पाटील, सुधाकर पाटील आदी

नरवेल येथील निळकंठ महाजन, भाऊराव पाटील, योगीराज महाजन, निवृत्ती पाटील, सुभाष महाजन, हर्षल कापसे, पंकज पंडित,पद्माकर कापसे, पंकज तायडे, सुधाकर पाटील, किरण पाटील, अरुण पंडित, प्रभाकर कोळी, डिगंबर महाजन, रमेश वालखड, प्रकाश तायडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here