मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या एकोणतीसाव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील,जि प सदस्य निलेश पाटील,अतुल भाऊ पाटील,प्रदिप साळुंखे,नंदकिशोर हिरोळे,लता ताई सावकारे,विकास पाटील,बबलू सापधरे ,बाळाभाऊ भाल शंकर,रविंद्र पाटील, सोनु भाऊ पाटील,राजेंद्र चौधरी, कैलास कोळी, आर डी पाटील,जे के चौधरी, राजेंद्र पाटील,अंकुश चौधरी,समाधान पाटील, राहुल पाटील, निलेश भालेराव,किसन चव्हाण, समाधान पाटील, पांडुरंग शेळके, बाळाभाऊ पाटील,विनोद काटे, भैय्याभाऊ पाटील,विशाल रोटे,शशांक पाटील, योगेश्वर कोळी, सिद्धार्थ तायडे, गोकुळ कोळी, भागवत कोळी,सारंग पाटील या पदाधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव, चिंचोल,मेहुण, चांगदेव येथिल ग्रामस्थां सोबत संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, गेले तिस वर्षापासून या मतदारसंघाने एकनाथराव खडसे यांना साथ दिली एकनाथराव खडसे यांनी सुद्धा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरातील सदस्य मानुन त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम मार्गी लावले कामे करताना पक्ष धर्म जात असा कोणताही भेदभाव केला नाही. प्रत्येक गावात मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला या परिसरातील प्रत्येक गावांना चहूबाजुनी डांबरी रस्त्यांनी जोडले
पुढे त्या म्हणाल्या की, कृषी मंत्रीअसताना केळी फळ पिक विम्याच्या निकषात बदल करून केळी उत्पादकांना पिक विम्याचा लाभ मिळवून दिला. आपल्या परिसरातील मुलांना कृषी विषयक उच्च शिक्षण मिळावे व शेतकरी बांधवांना शेतीतील नविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी मुक्ताईनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालयाची निर्मिती केली. भविष्यात कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेती मध्ये येणारे नविन तंत्रज्ञान कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतीच्या बांधापर्यंत पोहचेल. यातून शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढीसमदत होईल तसेच कृषी क्षेत्रातील संशोधनास मदत होईल. विकासाचा हा झंझावात पुढे सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद व्हा असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले
यावेळी मेहुण येथील सरपंच कोमल ताई पाटील, उपसरपंच रविंद्र पाटील,पुजा ताई पाटील,लिलाबाई इंगळे,राजकुमार ढिवर, किशोर पाटील, सुनिल पाटील, मोहन ढिवर, बाजीराव पाटील, श्रीराम पाटील, गोपाल पाटील, श्रीकृष्ण महाराज, मोहन पाटील, सुनिल पाटील, पवन पाटील,रमेश तायडे, दिनकर पाटील, वसंत जाधव, प्रविण पवार, राहुल तायडे, भास्कर सुरळके, लिलाधर माळे, चिंचोल येथिल श्रीराम चौधरी, अशोक पाटील, मोहन चौधरी, अरुण पाटील,बाबुराव पाटील, जगन्नाथ चौधरी, प्रकाश पाटील, अनिल चौधरी, राजेंद्र चौधरी, अनिल ठाकूर, महालक्ष्मी ताई ठाकूर, जगन्नाथ तायडे, काशिनाथ तायडे, श्रीराम तायडे, रामदास तायडे, भिमराव सुरवाडे, किशोर बोरसे,उमाकांत तायडे ,नितीन सोनवणे, संजय कोळी, भास्कर सोनवणे, चांगदेव येथील अतुल पाटील,मधुकर चौधरी, राजेश चौधरी, राजेंद्र पाटील, जे के चौधरी, कैलास कोळी, अंकुश चौधरी, सुपडू बोदडे,दत्तू चौधरी,दिपक जाधव, दिपक श्रीखंडे, सुनंदा ताई पाटील, नेहा ताई चौधरी, आर डी पाटील,डी के पाटील, व्हि ए महाजन, प्रदिप जवरे, महेंद्र पाटील, भुषण सावकारे, बि टी महाजन,तुषार वराडे, जयंत पाटील, डिगंबर चौधरी, नंदू चौधरी,तुषार सोनार,गोकुळ बोदडे, रामदास भोई,मुरलीधर बोदडे, वैभव बोदडे, भूषण इंगळे, युवराज बोदडे, अनिल मसाने,जिवराम महाजन, दिपक जाधव,स्वप्निल सोनवणे,दिपक ठाकरे, पवन कराड, राकेश कराड, कुंदन महाजन, कुणाल सोनवणे,जय सोनवणे, पियुष शेलार, अंकुश सोनवणे, गोलू महाजन, मानेगाव येथिल रविंद्र पांडुरंग पाटील, रविंद्र साहेबराब पाटील, सोनुभाऊ पाटील,विनोद कोळी,समाधान पांडे, सिताराम पाखरे, आत्माराम बेलदार, कांतीलाल वानखेडे,युवराज दिनकर पाटील, बाळू पाटील,सुरेश घटे,पांडुरंग बेलदार, संदिप घटे,अंकांत कोळी, चेतन पाटील, चंद्रकांत पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.







