पोलिस सेवा संघटनेच्या महिलाध्यक्षापदी शितल जडेंची निवड

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्र शिवराज्य कामगार हक्क संघटना , पुणे संचलित पोलिस सेवा संघटनेचे महिला अध्यक्ष्यापदी श्री एच.बी.संघवी हायस्कूल खेडगाव नंदी येथील इंग्रजी अध्यापिका श्रीमती शितल संजय जडे यांची जळ्गाव जिल्हा पोलिस सेवा संघटनेचे अध्यक्ष श्री भावेश प्रदिप ठाकुर व संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश डोंगळे यांनी निवड केली आहे.
पोलिस सेवा संघटना ही स्वयंसेवि असुन सदैव महिला व युवतींची छेडखाणी रोखणे, ग्राहकांच्या फसवणुकींच्या संरक्षणासाठी, ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी व बालकांच्या समस्या सोडवणे यासाठी निस्वार्थपणे कार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष्या शितल जडे यांनी सांगितले.व सामाजिक कार्य व महिला सक्षमिकर्णासाठी त्या तत्पर राहतील . शितल जडे यांचे विद्यालयाचे चेअरमन श्री संजय जी वाघ व मुख्याध्यापक एल.एस.शिंपी सर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यानी त्यांचे या नियुक्तीबद्दल अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here