नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – मौजे कन्साई येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पिकांवरील कीड व रोग नियंत्रण प्रात्यक्षिक कार्यक्रम कृषी विभाग यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी पिकांवरील कीड नियंत्रण करण्यासाठी चा योग्य वापर कसा करावा याविषयी माहिती देण्यात आली.
क्रॉप सॅप ( पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प ) या योजनेअंतर्गत कृषि सहाय्यक, श्री हरिभाऊ खोमणे यांनी सोयाबीन पिकांमध्ये फेरोमान ट्रॅपचा वापर हा सोयाबीन पिकाची आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ठरविण्यासाठी केला आहे . क्रॉपसॅप म्हणजेच पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प ही महाराष्ट्र शासन कृषि विभागाची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे या योजनेमध्ये कृषि सहाय्यकांनी क्रॉपसॅप सोयाबीन, कापूस, ऊस अशी तीन पिकांचे म्हणजे चं २ गावे ३ पिके अशी फिक्स प्लॉट घेतले आहेत .सोयाबीनचे मौजे कन्साई येथे २ फिक्स प्लॉट निवडले आहेत पहिला सोयाबीन प्लॉट हा सोनू महादू भील, दुसरा सोयाबीन प्लॉट दिगंबर सुकलाल ईशी यांचा निवडला आहे तसेच मौजे कन्साई येथे कापुस पिकाचा प्रथम फिक्स प्लॉट जोतेसिंग मोहनसिंग पाडवी यांचा निवडला आहे तर दुसरा कापूस प्लॉट सत्तरसिंग दगा भील यांचा निवडला आहे
मौजे नांदे येथील काशिराम गोरख ठाकरे यांचा ऊस पिकाचा फिक्स प्लॉट निवडला आहे व दुसरा फिक्स प्लॉट बिंदीबाई धेडसर भील यांचा ऊस पिक फिक्स प्लॉट निवडला आहे तरी क्रॉपॅसप फिक्स प्लॉट निवडताना २गावे ३ पिके व ६ फिक्स प्लॉट पिकांची याप्रमाणे निवड केली आहे यासाठी कृषि सहाय्यक हे २ जुलै पासून सोमवार ते बुधवार व गुरुवार ते शुक्रवार अशी पुर्ण आठवडयाचे एकूण वरील ६ फिक्स प्लॉटचे निरीक्षणे घेऊन एम .क्रॉप सॅप अॅपमध्ये नोंदविले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, पिकांवरील किंड व रोग यांचे सर्वेक्षण करून ती अँपमध्ये नोंदवणे व नोंदविलेल्या माहितीनूसार शेतकऱ्यांना किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करणे.








