ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अटक टाळण्यासाठी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी दोन वाजता पुढील सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने आव्हाड यांना अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालय निर्णय देईपर्यंत आव्हाड यांना अटक करु नये असे न्यायालयाने आदेश कालच दिले होते. आज जामिन मिळाल्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करुन याची माहिती दिली.
जामीन मिळला…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 15, 2022
आव्हाड यांच्यावर ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह बाबी चित्रपटात आढळल्याचा दावा करीत त्याआधारे या चित्रपटाला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह ऐतिहासिक बाबी काढून टाकाव्या यासाठी त्यांनी ठाणे शहरातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहातील एक शो देखील बंद पाडला होता. त्या संदर्भात त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्या गेला आहे.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३५४ नुसार त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंब्रा येथील कळवा, ठाणे शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.






