अहमदनगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनातर्फे हौशी रंगकर्मींसाठी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सुरु केली आहे. यंदा या स्पर्धेचे ६१ वे वर्ष आहे. अहमदनगर केंद्रावर ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा करत सावरकर प्रेमींनी दांगडो केला. त्यामुळे नाटक संपण्याच्या तयारीत असतानाच सावरकर प्रेमींनी सभागृहात उभे राहून, ‘हे नाटक बंद करा’अशी घोषणाबाजी केली. अहमदनगर केंद्रावर १५ नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा होत आहेत.
येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाच्या सादरीकरण दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा करत सावरकर प्रेमी चांगलेच चिडले. त्यामुळे नाटक संपण्याच्या तयारीत असतानाच सावरकर प्रेमींनी सभागृहात उभे राहून, ‘हे नाटक बंद करा’अशी घोषणाबाजी केली.
अखेर हा वाद मिटवण्यासाठी तोफखाना पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर या वादावर काही काळासाठी पडदा पडला. मात्र यावेळी याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घालणार असल्याचे सावरकर प्रेमींकडून सांगण्यात आले. येथील स्वराज्य प्रतिष्ठानने मंगळवारी राज्य नाट्य स्पर्धेत ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक सादर केले. मात्र या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा सावरकर प्रेमींनी केला.
अहमदनगर येथील स्वराज्य प्रतिष्ठानने आज राज्य नाट्य स्पर्धेत ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक सादर केले. मात्र या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा सावरकर प्रेमींनी केला. विशेष म्हणजे नाटकाचा शेवटचा अंक सुरू असताना सभागृहातील एका गटाने उभा राहून तत्काळ नाटक बंद करा, अशी मागणी केली.







