अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर संजय शिंदे) | भंडारदरा धरणाच्या शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून ‘भंडारदरा धरण प्रेमी मंडळ, शेंडी’ यांच्या वतीने भंडारदरा धरणावर आधारित १०० कवितांचा एक विशेष कवितासंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे. या उपक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कवी, कवयित्री आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
भंडारदरा धरण, त्याचा गौरवशाली इतिहास, परिसराचे निसर्गसौंदर्य, जलसंपदा, आदिवासी जीवन, पर्यटन तसेच धरणाशी निगडित वैयक्तिक आठवणी व भावविश्व यांवर आधारित उत्कृष्ट कविता या विशेष संग्रहासाठी मागविण्यात येत आहेत. कवींच्या निवडक कविता एकत्र करून हा स्मरणीय ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे.
कवींनी आपली कविता, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संक्षिप्त परिचय सुवाच्य अक्षरात किंवा टाईप करून पत्ता: मा. विकास पवार (इतिहास अभ्यासक, भंडारदरा धरण प्रेमी मंडळ, शेंडी), प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, देवठाण, ता. अकोले, जि. अहिल्यानगर. पिन – ४२२६०१ ई-मेल: [email protected] मोबाईल: ८४४६४८७३८१ यावर पाठवावा
शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने भंडारदरा धरण स्थळावर निमंत्रित कवींचे भव्य कवितावाचन सोहळा आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या कवींना प्रकाशित कवितासंग्रहाची एक प्रत, आकर्षक स्मृतीचिन्ह तसेच भंडारदरा धरणाच्या ऐतिहासिक स्थळी आपली कविता सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त कवी-कवयित्रींनी सहभागी होऊन भंडारदरा धरणाच्या शताब्दी सोहळ्याला आपल्या शब्दांची साहित्यिक भेट द्यावी, असे आवाहन भंडारदरा धरण प्रेमी मंडळाचे मार्गदर्शक मा. दिलीप भांगरे, प्रा. पुंडलिक गवंडी, मा. सुरेश सूर्यवंशी, मा. श्रीधर दराणे, मा. अमित संतोष पवार, मा. तुकाराम धांडे, मा. सागर खाडगीर, मा. गणेश गायकवाड, मा. गोपीनाथ भांगरे, मा. संजय बांडे, मा. ज्ञानेश्वर भांगरे, मा. प्राचार्य दिलीप रोंगटे, मा. डॉ. दिलीप बागडे, मा. स्वप्नील शहा, मा. पिंटूशेठ अवसलकर, मा. पत्रकार संजय महानोर, मा. पत्रकार वसंत सोनवणे, मा. ललित छल्लारे, मा. शिवराम कोंडारसर, मा. सुधीर कानवडे सर, मा. भारत भांगरे सर, मा. संध्या दौलतराव देशमुख, मा. सुनील काकड, मा. चंद्रमोहन निरगुडे, मा. मनोहर गायकवाड आणि मा. सुनील आहेर सर आदींनी केले आहे.







