तहसीलदार कार्यालयाशेजारी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह ; मृत्यूचे गूढ कायम

तहसीलदार कार्यालया

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | वडूज शहरातील तहसीलदार कार्यालयाशेजारी जुन्या पत्र्याच्या पंचायत समिती गोडाऊनसमोर एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृताची ओळख त्याच्याजवळ आढळलेल्या आधारकार्ड व पॅनकार्डवरून पटली आहे.

 

मृत तरुणाचे नाव रणजीत व्यंकपा वडीयार (वय २५ वर्षे, रा. तडकल, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे आहे. रणजीत हा वडूज परिसरात मजुरीचे काम करत होता. सध्या तो कातरखटाव रोड परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याच्या मृत्यूबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेहाबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here