जळगाव येथे विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समितीच्या वतीने समाजबांधवांना प्रदेशाध्यक्ष विद्यानंद मानकर यांचे मार्गदर्शन

विद्यानंद मानकर

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष विद्यानंद मानकर हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, यादरम्यान ते जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन मेळाव्यात प्रामुख्याने ‘संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळ’ संदर्भातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

 

या मेळाव्याच्या माध्यमातून समाजबांधवांनी आपले आर्थिक व व्यावसायिक उद्दिष्ट सफल करून घ्यावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व सुतार समाजबांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here