चंदूअण्णा नगरातील शिवगंगा मित्र मंडळाच्या गणेश आरतीस हर्षवर्धन खैरनार यांची उपस्थिती

चंदूअण्णा नगरातील

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | जळगाव शहरातील चंदूअण्णा नगर परिसरातील शिवगंगा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश आरतीस लोकनेते अजितदादा पवार फाऊंडेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन खैरनार यांनी काल उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी हर्षवर्धन खैरनार यांनी गणरायाची मनोभावे आरती करून जळगाव शहरातील नागरिकांसह सर्व गणेशभक्तांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद लाभावा, अशी प्रार्थना केली.

 

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. गणेश मंडळांच्या माध्यमातून विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जात असून, या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शिवगंगा मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या वतीने हर्षवर्धन खैरनार यांचे स्वागत करण्यात आले.

हर्षवर्धन खैरनार

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here