जळगाव (प्रतिनिधी) : समाजाच्या हक्कांसाठी आग्रही असणारी व प्रसंगी आक्रमक होवून समाजबांधवांसाठी भांडणारी संघटना म्हणून मराठा क्रांती स्वराज्य संघटनेची ओळख आहे. या संघटनेच्या सोशल मीडिया राष्ट्रीय अध्यक्षपदी बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्येष्ठ समाज नेते उद्योजक गजाननराव साळुंखे राष्ट्रीय सचिव संजयराव साळवी संस्थापक सदस्य गुजरात राज्य अध्यक्ष प्रदीप मोरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद महापदी यांनी ही निवड जाहीर केली व तसे नियुक्तीपत्र सुनिल पाटील यांना प्रदान केले.
याप्रसंगी बोलताना गुजरात राज्य मराठा समाज नेते उद्योजक सुरत शहर अध्यक्ष राजूभाई शेवाळे यांनी सांगितले सुनिल पाटील अनेकवर्ष पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे बुलंद पोलीस टाइम्स मुख्य संपादक म्हणून गेली
दहा वर्षे कार्यरत आहेत जळगाव जिल्हा एरंडोल तालुका अध्यक्ष पदी तर काही वर्ष जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून भरीव कामगिरी बजावली होती पोलीस टाईम्स साप्ताहिक गुजरात गोवा कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान उतर प्रदेश आदी राज्यासह वितरित केले जाते सुमारे पाच हजार पत्रकार प्रतिनिधी म्हणून देशभर कार्यरत आहेत.
त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून हजारो समाज बांधव प्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सदिच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे कोकण प्रदेशाध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त विनोदराव चव्हाण राष्ट्रीय युवा नेते सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष विशाल परब रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल चव्हाण दक्षिण जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत मोरे जिल्हा सरचिटणीस प्रथमेश सावंत मुंबई प्रदेश अध्यक्ष विनायक पाटील कार्याध्यक्ष चंद्रकांत मोजाड नवी मुंबई अध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र महापदी दक्षिण गुजरात प्रमुख ॲड विराज सुर्वे वसई विरार महानगर पालिका अध्यक्ष जितेन्द्र पालांडे रंगभूमी चित्रपट विभाग राष्ट्रीय अध्यक्ष निलेश पालांडे ठाणे शहर उपाध्यक्ष अशोकराव पालांडे सरचिटणीस प्रा मोहन शिंदे ठाणे जिल्हा ग्रामीण महीला अध्यक्षा सौ प्रिती भोसले कोकण प्रदेश महीला अध्यक्षा सौ ज्योती लक्ष्मणराव भोसले मुंबई प्रदेश महीला अध्यक्षा सौ भक्ती भार्गव भोसले रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अंकुश चाळके आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.







