सोलापूर -धुळे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

kannad-accident

कन्नड (प्रतिनिधी प्रदीप मोरे) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत बायपास वरील टी पॉइंट जवळ असलेल्या गतिरोधकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार झाल्याची घटना घडली आहे

 

दि ०९ च्या रात्री अंदाजे १० ते १२.३० वा.दरम्यान अपघात झाला. यामध्ये पायी जाणार इसम वसीम अय्युब शेख (वय ३५ रा. नितीन नगर कन्नड) यास अज्ञात वाहनेच्या धडकेत मृत्यू झाला, वसीम हा अंडे विक्रीच्या व्यवसाय करत होता ,

 

त्याच्या पश्चात पाच आई, वडील, ३ मुली, २ मुले , ३ भाऊ , त्यातील एक भाऊ ३ वर्षा आधी मरण पावला होता , १ बहीण असा परिवार आहे , कन्नड शहर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव ,पोलिस निरीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसहेडकॉन्स्टेबल जयंत सोनवणे हे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here