रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत विज्ञान प्रदर्शन

rosland-school-science-faire

जळगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण व्हावी. त्यांच्या दैनंदिन जीवनातील कुतूहलातून निर्माण झालेल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याची त्यांना सवय लागावी यासाठी आज (दि.१०) रोजी रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

 

या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने स्व.लता मंगेशकर या सभागृहाचे उद्घाटनदेखील करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोझलँड शाळेचे शैक्षणिक सल्लागार, हैदराबाद येथील (ईएफएल) विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू अमेरिकेतील प्रोफेसर डॉ. वृद्धगिरी गणेशन हे लाभले होते. त्यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनानिमित्त प्रोफेसर डॉ. वृद्धगिरी गणेशन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोजमीन खीमानी प्रधान यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध प्रकल्प सभागृहात प्रदर्शित केले होते. यासाठी विद्यार्थ्यांना सानिया रोज प्रधान व लारा यांचे मार्गदर्शन लाभले. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी फूड एडल्ट्रेशन, वॉटर सायकल, व्हॅक्युम क्लीनर , ॲनिमल सेल, ऑटोमिक मॉडेल, मनी प्रिंटर, बायोगॅस, थ्रीडी होलोग्रम वर्किंग मॉडेल याप्रकारे अनेक प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या केले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here