रोझलॅण्डमध्ये कर्नल अब्दुल शेख यांच्या श्रध्दांजली सभेचे आयोजन

con-abdul-latif-shaikh

जळगाव (प्रतिनिधी) – येथील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या रोझलॅण्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या महत्त्वाच्या सहाय्यकर्त्यांपैकी एक महत्वाचे व्यक्तिमत्व असलेल्या कर्नल अब्दुल लतीफ शेख यांचे नुकतेच वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उद्या (दि.२६) दुपारी ४ वाजता रोझलॅण्ड इंग्लिश मिडीयम येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कर्नल अब्दुल लतीफ शेख यांनी ३० जून १९६३ ला सैन्यदलातील सेवेसाठी कमिशन घेतले होते व ३० जून १९८९ रोजी ते सैन्यदलातून निवृत्त झाले होते. आपल्या सैन्यदलातील कारकिर्दीत त्यांनी १९६५ व १९७१ च्या युध्दात सहभाग घेतला होता. रोझलॅण्ड स्कूलच्या उत्कर्ष व प्रगतीमध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य होते. त्यांची तिनही मुलांनी रोझलॅण्डमध्येच शिक्षण घेतले होते.

 

या श्रध्दांजली सभेला कर्नल शेख यांचे नेव्हीमध्ये कार्यरत असलेले त्यांचे चिरंजीव जावेद शेख हे देखील उपस्थित राहणार आहेत. जळगाव शहरातील शैक्षणिक उत्कर्षाला सहकार्य करणाऱ्या व देशाच्या संरक्षणासाठी सेवा करणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या श्रध्दांजली सभेला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रोझलॅण्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अध्यक्षा रोझमिन खिमाणी प्रधान यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here