रोझलॅण्ड स्कूलच्या संस्थापिका दौलत खिमाणी यांना विविध कार्यक्रमांद्वारे आदरांजली अर्पण

daulat-kimani-birth-anniversary

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचालित रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या संस्थापिका स्वर्गीय दौलत खिमानी यांच्या जयंतीनिमित्त व संस्थेच्या स्थापनादिनानिमित्त सौ. रोझमीन खिमानी प्रधान, सानिया रोज प्रधान यांनी स्वर्गीय दौलत खिमानी यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून यांना आदरांजली अर्पण केली.

 

या स्थापनादिनाचे औचित्य साधून शाळेत माय एफ.एम.रंगरेज तर्फे चित्रकला स्पर्धा, क्रीडा पालक शिक्षक बैठक आयोजित करण्यात आली . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून फिरोज पठाण व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर मुंबईचे सीनियरऑफिसर व राष्ट्रीय खो-खो खेळाडू यशवंत वाळके हे उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.पठाण यांनी खेळ आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे, तसेच खेळाचे विद्यार्थी जीवनाशी असलेले अनन्यसाधारण महत्त्व सांगितले. तसेच स्वर्गीय दौलत खिमानी यांच्या आठवणी विषद करत ते पुढे म्हणाले की, यंदा शाळेचे ५० वर्ष पूर्ण होऊन स्वर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांद्वारे पुन्हा शैक्षणिक अवकाशात नवी भरारी घ्यावी, अशी आशा व्यक्त करत त्यांनी अध्यक्षा सौ.रोझमिन खिमाणी प्रधान यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

 

rosland-school-mother-child-programeसंस्थापिका स्वर्गीय दौलत खिमानी यांच्या जयंतीनिमित्त पूर्व प्राथमिक वर्गातील (बालवाडी) विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आई व लहान मुल ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत लहानपणी शिक्षणाचे महत्त्व, आई व मुलांमधील प्रेमळ नाते, लहान मुलांना खेळामार्फत शिक्षण देऊन त्यांचे बालपण जोपासणे. यावर शाळेच्या अध्यक्ष सौ. रोझमिन खिमानी प्रधान यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अमेरिकेतून आलेल्या स्वयंसेवकांच्या टीमने व सानिया रोज प्रधान यांनी उपस्थित महिलांना योगा व झुंबाचे प्रशिक्षण दिली. तसेच चित्रकला, गीतगायन असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा विनीत जोशी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here