मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अवघ्या चार तासात शोधून दिला हरवलेला मोबाईल

marin-drive-police

मुंबई (महाराष्ट्र राज्य निवासी संपादक सोमनाथ जाधव) : मोबाईल हा आता प्रत्येकाचा अविभाज्य घटक आहे. मात्र हा मोबाईल हरवला तर अनेकांना अस्वस्थ वाटतं, साहजिक आजकालच्या मोबाईलच्या किंमती आणि मोबाईलची सवय, यामुळे हे वाटणं साहजिक आहे. मात्र एखादा हरवलेला मोबाईल सापडणं हे क्वचितच शक्य होतं. पण तो सापडला तर ज्याचा मोबाईल आहे त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही. असाच काहीसा अनुभव सुरेश पाठनाईक यांनी घेतला.

सुरेश पाठनाईक यांचा हरवलेला मोबाईल मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल होताच तातडीने कारवाईला सुरुवात करत अवघ्या चार तासांच्या आत त्यांचा मोबाईल परत मिळवून दिला.

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तसंच महिला पोलीस अधिकारी लवटे, महिला पोलीस अंमलदार गावित व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार कृष्ण सांगळे यांच्या टीमने मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही फुटेज बघून तात्काळ सुरेश पाठनाईक यांचा मोबाईल चार तासाच्या आत मिळवून दिला. पोलिसांच्या या तात्काळ कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचे सुरेश पाठनाईक यांनी आभार मानले असून, प्रामाणिकपणे काम करून जनतेमध्ये पोलीस आपले रक्षक असल्याच्या समजाला अधिक दृढ केल्याबद्दल बुलंद पोलीस टाइम्सतर्फे या सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here