जिल्हाधिकाऱ्यांच्या साथ रोग नियंत्रण आदेशाची ऐसीतैसी; विनापरवाना शहाद्याहून पुणे – मुंबई लक्झरी प्रवाशी वाहतूक सुरू

शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – सध्या करोना महामारीच्या काळात प्रशासनाकडून काही नियम व अटींचे पालन करणे अनिवार्य आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवत शहादा _पुणे -मुंबई अशी प्रवासी वाहतूक सर्रासपणे विनापरवाना सुरू आहे. सर्रासपणे सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन लक्झरी व्यवस्थापनाकडून केले जात आहे.याकडे प्रशासन मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
एकेकाळी ग्रीन झोन मध्ये असणारा शहादा तालुका सध्या रेड झोन मध्ये रूपांतरित होण्यासाठी अशीच काही कारणे कारणीभूत आहेत.खाजगी वाहतूक आपण करीत असाल तरी देखील सैनी टायझर आणि सोशल डिस्टंसिंग चे पालन होणे अतिशय गरजेचे असताना देखील या ठिकाणी त्याचे पालन होतांना दिसत नाही.आधीच कोरोनाव्हायरस च्या भितीमुळे जनता हैराण असताना यांच्या मात्र बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक सुरू असल्याकारणाने कोरणा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र शहरासह परिसरात आढळून येत आहे.
गेल्या आठवडाभरापासून दररोज शहादा येथून दोन टेम्पो ट्रॅव्हलर बसेस व एक लक्झरी बस पुणे व मुंबई अशी सर्रासपणे वाहतूक करीत आहेत.याविषयी प्रशासनाशी संपर्क साधला असता याबद्दल कोणालाही परवानगी दिलेली नाही .आम्हाला त्याबद्दल नाही माहिती नसल्याचे अनभिज्ञता त्यांनी दर्शवली. तरी संबंधितांवर योग्य ती कारवाई करून करोना संसर्ग वाढणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष घालावे ही मागणी जनतेकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here