पोलीस टाईम्समधील नियुक्तीबद्दल पिलीव ग्रामपंचायतीतर्फे विनोद लोखंडे व समाधान लोखंडे यांचा सत्कार

piliv-grampanchyat

पुणे (जिल्हा प्रतिनिधी सुहास गायकवाड) : महाराष्ट्रासह पाच राज्यात पोलीस व जनतेतील दुवा म्हणून कार्य करणाऱ्या साप्ताहिक बुलंद पोलीस टाइम्सकरिता तसेच बुलंद पोलीस टाइम्सच्या वेबपोर्टलकरिता तालुका प्रतिनिधी म्हणून विनोद हणमंत लोखंडे व तालुका क्राइम रिपोर्टर म्हणून समाधान उत्तम लोखंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पिलीव ग्रामपंचायत तसेच साठेनगर मधील कार्यकर्ते व सदस्याकडून सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

 

buland-police-timesया सत्कार समारंभाला पिलीव ज्येष्ठ पत्रकार- दामोदर लोखंडे, माजी सरपंच -आप्पासाहेब लोखंडे, पत्रकार -सुजित सातपुते, ग्रामपंचायत सदस्य- जीवनदादा गुरव, माजी ग्रामपंचायत सदस्य -सुरेश लोखंडे, उद्योजक-सागरभाऊ लोखंडे. लहू शक्ती सेना तालुका उपाध्यक्ष-विकास लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते -तानाजीभाऊ लोखंडे, कुमारभाऊ लोखंडे, सारंग बनसोडे. नितीन कपणे, आबा बनसोडे(आरपीआय खजिनदार ), संजय करडे, महेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पिलीव येथील साठेनगर मधील सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत. सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पिलीव ग्रामस्थदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here