माळशिरस (तालुका प्रतिनिधी विनोद लोखंडे) : मौजे पांगरी तालुका बार्शी या ठिकाणी 1 जानेवारी रोजी झालेल्या फटाक्याच्या कारखान्यातील स्फोट प्रकरणी पाच महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता व अनेक कामगार जखमी झालेले होते.
घटनास्थळी दिनांक ७ जानेवारी रोजी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे तसेच माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजीभाऊ गायकवाड , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव महाराज भोसले यांनी मयतांच्या कुटुंबाला व जखमी झालेल्यांना भेट देऊन बार्शी येथे पत्रकार परिषद घेतली .
२०१७ पासून विनापरवाना सदर फटाके कारखाना सुरू होता कामगारांना कसलीही सुरक्षा पुरवली जात नव्हती , सर्व कामगार | दलित समाजाचे असल्यामुळे त्यांना वेठीस धरून काम करून घेतले जात होते या अनुशंगाने संबंधित कारखानदाराला पाठीशी घालणारे बार्शीचे तहसीलदार व एवढे वर्ष डोळे बंद करून पेट्रोलिंग करणारे पांगरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करून सहआरोपी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली तसेच मयत हे सर्व दलित समाजाचे असल्यामुळे संबधित गुन्हात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार व वेठबिगारी कायद्याने गुन्हा दाखल करून मयताच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी तसेच जखमी यांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मागणी केली आहे . अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे







