पत्रकार दिनानिमित्त पारोळा पोलिसांतर्फे पत्रकारांचा सत्कार

Journalists-felicitated-by-Parola-Police

पारोळा (जिल्हा क्राइम रिपोर्टर डॉ.दिपक पाटील) : पत्रकार दिनानिमित्त पारोळा येथील पोलीस स्टेशनमध्ये पारोळा पोलिसांतर्फे शहरातील पत्रकारांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

Journalists-felicitated-by-Parola-Police-on-the-occasion-of-Journalists'-Day parola-journalist

६ जानेवारी रोजी ‘दर्पण’ या पहिल्या साफ्ताहिकाची सुरूवात झाली.याच दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचाही जन्मदिवस आहे. त्यांच्या स्मृतीसाठी हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो.

 

महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्वच वर्गातील वृत्तपत्र आणि मासिकांना बाळशास्त्रींनी एक वाट दाखवली. बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here