जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : शहरात चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमधील जय लहरी ट्रेडर्स दुकानातून ७३ हजारांचा मुद्देमाल लांबवल्या प्रकरणी रविवारी दुपारी १२ वाजता भिलवाडी परिसरातून दोन अल्पवयीनांसह एकाला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या मुद्देमालासह दुचाकी जप्त करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, हेमंत नंदलाल रंगलानी ( वय- ५०) रा. साने गुरुजी कॉलनीच्या मागे टेलीफोन नगर जळगाव, हे आपल्या परिवारास वास्तवले आहेत. त्यांचे चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंग येथे जय लहरी ट्रेडर्स नावाचे शेतातील लागणारे इलेक्ट्रिक मोटर यांचे दुकान फोडून सुमारे ७३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. चोरी करतांना ३ चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या प्रकरणी सोमवार २ जानेवारी रोजी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, सलीम तडवी गणेश पाटील, जुबेर तडवी, समाधान पाटील, अमित मराठे, नरेंद्र देवकर, केतन सूर्यवंशी, अशांनी रवीवारी ८ जानेवारी रोजी कारवाईत करत दुपारी १२ वाजता संशयित आरोपी विशाल उर्फ इस्टीन युवराज सोनवणे, (पावर हाउस भिलवाडी जळगाव) याला त्याच्या राहत्या परिसरातून अटक केली आहे. दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. चोरीला गेलेला ७३ हजार रुपयांचे मुद्देमाल आणि गुन्हा वापरलेले दुचाकी ( एमएच १९ सीजी ६१०५) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास हवलदार गणेश पाटील करीत आहे.







