चोपडा (प्रतिनिधी रविंद्र कोळी) : येथील ग्रामीण पोलिसातील सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले,चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू यांना बातमी मिळाल्याने यांच्या नेतृत्वात सापळा लावून गुरांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप पकडली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्यासोबतच्या पथकातील पोहेकाँ लक्ष्मण शिंगणे,पोहेकाँ राकेश पाटील,पोना शशिकांत पारधी,पोना.किरण पाटील,पोकाँ जगदीश पाटील पोकाँ.विशाल पाटील पोकाँ.दिलीप जाधव अशांनी सापळा रचून हातीळ गावाचे पुढे बोलेरो पिकप गाडी (क्र.एम.पी.०८ – जी ए २०४९) हीचेत अवैधरित्या चारही पाय बांधून कोंबून भरून वाहतूक करीत असलेले वाहन युग पेट्रोल पंपचे जवळपास थांबविले असता त्यावरील चालक व क्लिनर असे वाहन सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
सदर वाहनात ०९ लहान मोठे ०२ ते ०४ वर्षे वयाचे गोऱ्हे व वाहन याच अंदाजे किंमत १,३५,०००/- रुपये असे कत्तलीसाठी घेऊन जाण्याचे उद्देशाने मिळून आले तरी सदर बाबत पोहेकाँ राकेश पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला ०००२/२०२३ प्रा.कृ.वा.देण्यास प्र.का.क.११ ड.ई.फ.क प्राणी सं.का.क.५ अ, ५ ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील गुन्ह्याचा तपास सपोनि.मार्गदर्शनाखाली पोहेकाँ.लक्ष्मण शिगाणे हे करीत आहेत.







