नगर येथे मृत पोलीस अंमलदारांच्या वारसांना मदतीचा हात

A-helping-hand-to-the-heirs-of-the-deceased-police-officers-in-the-city

अहमदनगर (प्रतिनिधी) : कर्तव्यावर असताना मृत झालेल्या सात पोलीस अंमलदारांच्या वारसांना अहमदनगर जिल्हा पोलीस को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते देण्यात आला.

 

यावेळी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र सुद्रिक, संचालक लक्ष्मण खोकले, सचिव संजय चोरडिया, लिपीक प्रकाश पाठक यांच्यासह पोलीस अंमलदार उपस्थित होते. अलिकडच्या काळात पोलीस अंमलदारांवर कामाचा ताण वाढला आहे. ते कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. जिल्हा पोलीस दलातील सात अंमलदारांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला आहे.

 

त्यांच्या वारसांना अहमदनगर जिल्हा पोलीस को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सभासद कल्याण निधीतून मदत केली जाते. प्रत्येक मयत अंमलदारांच्या वारसांना एक लाख रूपयांचा धनादेश दिला जातो. गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते हा मदतीचा धनादेश सात मयत अंमलदारांच्या वारसांना देण्यात आले. माया संजय कदम, किर्ती सुनील मोरे, विक्रम विठ्ठल केदारे, राणी नामदेव सानप, लताबाई राधाकृष्ण साबळे, रेखा गोकुळचंद परदेशी, रंजना भाऊसाहेब आघाव यांच्याकडे धनादेश सुर्पूत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here