मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानं एका व्यक्तीला अटक केली असून, त्याच्याकडून ३२५ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे एक कोटी तीस लाख रुपये इतकी असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकांच्या वतीनं देण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चार लाख साठ हजारांची रोकड देखील आढळून आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३२५ ग्रॅम हेरॉईन आढळून आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे १ कोटी ३० लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे ४ लाख ६० हजार रुपयांची रोकड देखील आढळून आली आहे. दरम्यान आता हे अंमली पदार्थ कुठून आले, आरोपी हे हेरॉईन कुठे नेणार होता याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.







