मनोरुग्ण मुलीवर ३ अल्पवयीन मुलांचा बलात्कार; व्हिडीओ सोशल मिडीयावर केला व्हायरल

मुंबई (प्रतिनिधी हितेंद्र मिस्त्री) : घाटकोपरमध्ये मनोरुग्ण मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला आहे. सार्वजनिक शौचालयात या मुलीवर अत्याचार करण्यात आले. या तीन मुलांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला. मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक करून बालसुधार गृहात पाठवलं.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी याबाबतची माहिती मिळाली. सार्वजनिक शौचालयात ही मुलगी गेली असताना तीन जण आतमध्ये आले आणि त्यांनी अत्याचार केले तसंच याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, अशी तक्रार मुलीने पोलिसांकडे केली. यानंतर तिघांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडिओबद्दल कळल्यानंतर मुलीच्या भावाने कुटुंबाला या घटनेबाबत माहिती दिली.



या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आयपीसी कलम ३७६, ३७६ (जे) (एल), ३२३, ५००, ३४ आणि पॉक्सो कलम ४, आयटी कलम ६६ (ई) ६७ (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तीनही आरोपींना अटक करून बालसुधार गृहात पाठवण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here