जळगाव (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ने कहा गये वो 20 लाख करोड हे आंदोलन करण्यात
आले व छोटे व्यावसायिक व्यापारी, शेतकरी व बेरोजगार सोबत संवाद साधुन त्याचा कडून केंद्र सरकारच्या पॅकेज चा लाभा संदर्भतील वस्तू स्थिती जाणून घेण्यात आली.
गेली ६ वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार असून या सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या देशातील जनतेला भोगावे लागत आहेत.आज आपल्या देशाने बेरोजगारीचा उच्चांक गाठला आहे.कोरोनाच्या संकटकाळातील अनियंत्रित व ढिसाळ कारभारामुळे युवकांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची तर अनेकांवर आत्महत्येची वेळ आली आहे.तर काही व्यसनाच्या व गुन्हेगारीच्या मार्गावर आहेत. लघु व मध्यम उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत.केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेज पैकी १० हजार कोटींचे पॅकेज लघु व मध्यम उद्योगांसाठी जाहीर केले होते.व केंद्रीय अर्थमंत्री मा.सीतारमण यांनी मीडियामध्ये मोठा गाजावाजा करून ते जाहीर देखील केले होते.परंतु यातील कुणालाच काहीच मिळालेले नाहीत. केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे त्या प्रमाणे शेतकऱ्यांना देखील काहीच मदत मिळाली नाही . म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश सरचिटनिस मुक्तदिर बाबा देशमुख , जळगाव शहर अध्यक्ष मुजीब पटेल, मोहसीन शेख, रईस कुरेशी,यांनी केंद्र सरकारचा 20 लाख कोटीचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा भाजप कार्यालय समोर शांतातापूर्ण आंदोलन केले.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकार चा 20 लाख कोटींचा पर्दाफाश







