देशाचा अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीममध्ये आहे झुरखेड्याचा खान्देशपुत्र

Khandeshputra-of-Zurkheda-is-in-the-team-preparing-the-country's-budget

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : पुत्र व्हावा एैसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणजेच अर्थात अफाट, अचाट असे कर्तृत्व असणारा मुलगा असावा.ही उक्ती सार्थ करणारे कर्तृत्व जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील झुरखेड्याचे खान्देशपुत्र सुनील भागवत चौधरी यांनी गाजविले असून त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे वडील ह.भ.प.भागवत छन्नू चौधरी यांच्यासह खान्देशवासियांचा उर अभिमानाने भरुन आल्याशिवाय राहणार नाही.

आज (दि. १) रोजी लोकसभेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी दोन महिन्यांपासून कामकाजाला प्रारंभ होतो. यासाठी एक टीम तयार करण्यात येते, जोपर्यंत अर्थसंकल्प सादर होत नाही तोपर्यंत हे सर्व सदस्य अज्ञातवासात असतात, हाच अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीममध्ये सुनील भागवत चौधरी यांचा समावेश असून ते देशाच्या अर्थमंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.

 

सादर होणाऱ्या देशाच्या अर्थसंकल्पीय टीमचे सदस्य असलेल्या सुनील चौधरींमुळे केवळ झुरखेड्याच नाही तर संपूर्ण खान्देशचा गौरव झाला आहे. वारकरी संप्रदायाचे पथिक असलेल्या ह.भ.प.भागवत चौधरी यांच्या या सुपुत्राने संत तुकाराम महाराजांच्या ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या अभंगाप्रमाणे आपल्या कर्तृत्वाने खान्देशचे नाव देशाच्या नकाशावर कोरले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here