मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : दहिसर परिसरात अग्निशमन दलाच्या भरतीवेळी मोठा गोंधळ उडाला असून, भरतीसाठी आलेल्या मुलींवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू असून राज्यभरातून महिला उमेदवार भरतीसाठी आल्या. मात्र, भरतीमध्ये अपात्र ठरवलेल्या महिला उमेदवार संतापल्याने वातावरण शांत करण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
#WATCH | Women who reached for the recruitment of Women Fire Brigade clashed with police in Mumbai, Maharashtra pic.twitter.com/RQxGIv6avd
— ANI (@ANI) February 4, 2023