जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर अशोक तायडे) : भारत सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र जळगाव आणि नक्षत्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल दोनगाव येथे करण्यात आले होते.
या शिबिरात जिल्हाभरातून निवडक ४० युवक युवतींना संधी देण्यात आली होती. या तीन दिवसात युवकांना विवेक होशिंगे, उप वन संरक्षक अधिकारी, जळगाव, सौ. देवयानी गोविंदवार, अध्यक्ष – महिला व बालकल्याण समिती जळगाव, मनोज गोविंदवार, सुप्रसिद्ध समुपदेशक, लेखक तथा आपण पब्लिकेशनचे संस्थापक, नरेंद्र डागर, जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र जळगाव, अशोक पाटील, प्राचार्य इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल दोनगाव, प्रा.जतिन मेढे, प्राध्यापक भालोद कॉलेज, अमित मोहिते, सदस्य इंटरनॅशनल UNAID कमिटी या मान्यवरांनी पहिल्या दिवशी मार्गदर्शन केले.
तर दुसऱ्या दिवशी मयूर वाघ, महाराष्ट्र राज्य जिल्हास्तरीय युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त, आकाश पाटील, युवा उद्योजक जळगाव, गौरव महाले, विद्यार्थी प्रिय शिक्षक, चोपडा, प्रनिलसिंह चौधरी, सचिव योगी फाऊंडेशन, जळगाव या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
तिसऱ्या दिवशी युवकांना अनिल भोकरे, कृषी उपसंचालक जळगाव जिल्हा, संदीप पाटील, करियर सल्लागार तथा सदस्य महिला व बालकल्याण समिती जळगाव, सागर सिनारे, कृषी अधिकारी यावल, अजय खैरनार, सहाय्यक कृषी अधिकारी यावल, मनीष पाटील, सचिव इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल दोनगाव, नरेंद्र डागर, जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र जळगाव, अजिंक्य गवळी, लेखापाल नेहरू युवा केंद्र जळगाव या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या संपूर्ण शिबिरात युवक युवतींना खूप काही शिकण्यास मिळाले. वेगवेगळ्या ॲक्टिविटी योगा, प्राणायाम, पथनाट्य, पेपर प्रेझेंटेशन,जुने खेल आदी गोष्टी घेण्यात आल्या. या सर्व नियोजनात योगेश जी चौधरी आणि दुषांत बोंबले यांचे सहकार्य लाभले. नेहरू युवा केंद्र जळगाव येथील जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष व्हि. डी.पाटील आणि सचिव मनीष दादा पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले.







