नाशिक (विशेष प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईचे मुख्य विश्वस्त व केंद्रीय माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे नाशिक नगरीत स्वागत करण्यात आले.
यावेळी नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा रवींद्र कदम , प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, खजिनदार ईश्वर जगताप, कार्यकारणी सदस्य सुनील परमार व प्रतीक शर्मा. याप्रसंगी शरदचंद्रजी पवार यांना राष्ट्रवादी फ़ंडातून शिरवाडकर, कानेटकर व सावंत पुरस्कारासाठी भरघोस आर्थिक मदत करावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले .
या निवेदनाची एक प्रत माजी उपमुख्यमंत्री व माजी पालकमंत्री छगनराव भुजबळ व माजी आमदार व ज्येष्ठ रंगकर्मी हेमंतराव टकले यांना देण्यात आले . या मदतीबाबत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे . याप्रसंगी शाखेचे कार्यकारणी सदस्य विनोद राठोड , विशाल जातेगावकर व इतर उपस्थित होते .







