नवी दिल्ली (वृत्तसंस्था) । कॅनडामधील सरे येथे गुरु नानक सिंग गुरुद्वारामध्ये दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर यांच्यावर गोळ्या झाडत त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे.
कॅनडातील शीख फॉर जस्टिसचा हरदीपसिंग निज्जर प्रमुख होता. तसेच तो खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता. कॅनडात बसून हरदीपसिंग निज्जर भारताविरुद्ध देशविरोधी कारवाया करत होता. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ज्या गुरुद्वाऱ्यात निज्जरची हत्या झाली त्या गुरुद्वाराचे प्रमुखही होते. शीख फॉर जस्टिस या संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्याही हरदीपसिंग निज्जर जवळचा होता.
हरदीपसिंग निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्स या संघटनेचा प्रमुख होता. कॅनडामध्ये बसून तो खलिस्तानी कारवाई करत होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने सप्टेंबर २०२० मध्ये हरदीपसिंग निज्जरला दहशतवादी घोषित केले होते यानंतर हरदीपसिंग निज्जरच्या जालंधरच्या भरसिंग पुरा गावामधील मालमत्ताही जप्त करण्यात आली होती. हरदीपसिंग निज्जरने याच गावामधील एका पुजाऱ्याची हत्या केली होती. या हत्याद्वारे तो पंजाबमध्ये धार्मिक अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर एनआयएने हरदीपसिंग निज्जरवर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतंच 4 महिन्यांपूर्वी हरदीपसिंग निज्जरच्या केटीएफ संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले होते. “खलिस्तान टायगर फोर्स” ही कट्टरतावादी संघटना आहे. ज्यांचा मुख्य उद्देश हा पंजाबमध्ये दहशतवाद पसरवण्याचा आहे. पंजाबमधील टार्गेट किलिंग प्रकरणात या संघटनेचा मोठा हात आहे. ही संघटना भारताच्या एकता, राष्ट्रीय सुरक्षा, अखंडता,आणि सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.







