नाशिक (प्रतिनिधी जितेंद्र पाटील) । नशेसाठी वापरले जाणारे एमडी (मॅफेड्रीन पावडर) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास विशेष पोलिस पथकाने अटक केली. रविवारी रात्री म्हाळदे शिवारात केलेल्या कारवाईत ६२.२४ ग्रॅम एमडी पावडर व कार असा ११ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संशयित अतिक अहमद सलीमुद्दीन शेख हा नशाकारक अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सहायक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक व पवारवाडी पोलिसांनी सापळा रचला. संशयित अतिक कारने येताच पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडले.







