पोहण्याची हौस नडली; क्रीडा संकुलाच्या तलावात बुडाल्याने‎ तरूणाचा मृत्यू

sinking-man

जळगाव (कार्यकारी संपादक समाधान पाटील) । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज‎ क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण‎ तलावात २२ वर्षीय फळविक्रेत्या‎ तरुणाचा रविवारी सायंकाळी बुडून‎ मृत्यू झाला. त्याला पोहता येत नव्हते‎ आणि ही बाब जीवनरक्षकांना‎ सांगितलेली होती, असा दावा त्याला‎ तरणतलावावर घेऊन येणाऱ्या मित्रांनी‎ केला आहे

 

दुसरीकडे पोहोण्याची वेळ‎ संपल्यानंतर ही घटना घडल्याचा दावा‎ जीवनरक्षकाच्या हवाल्याने जिल्हा‎ क्रीडा अधिकारी करीत आहेत.‎

 

दरम्यान, तरणतलावावरील सीसीटीव्ही‎ कॅमेरे बंद असून क्रीडा विभागाने‎ कर्मचाऱ्यांअभावी सर्व जबाबदारी‎ कंत्राटदारावर टाकली असल्याची‎ बाबही या निमित्ताने समोर आली आहे.‎ काही वर्षांपूर्वी या तरणतलावात यश‎ हेमंत शहा नामक ११ वर्षे वयाच्या‎ मुलाचा बुडून मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here