दाळफळमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्‌घाटन

shivsena-branch-opening

जळगाव (कार्यकारी संपादक समाधान पाटील) । आज दिनांक १६ जून २०२३ रोजी छ.शिवाजीनगर येथील शृंगऋषी चौक,दाळफळ येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (शाखा क्रमांक ८३) चे उद्घाटन करण्यात आले.

 

१९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे जळगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने आठवडाभर आधीपासूनच विविध उपक्रमांना सुरुवात करण्यात येते.वर्धापन दिनाच्या निमित्ताने छ.शिवाजीनगर येथे शृंगऋषी चौक,मारवाडी गल्ली,दाळफड येथे शिवसेनेच्या ८३ व्या शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. सदर शाखेचे नियोजन मा.विभाग प्रमुख विजय राठोड यांनी केले.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ,जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, महानगरप्रमुख शरदआबा तायडे,समन्वयक अंकुश कोळी, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकिर पठाण, माजी नगरसेवक संजय राठोड,ज्येष्ठ शिवसैनिक गणेश मोझर,शेषराव वलकर, अंबादास निकम,लक्ष्मन सांगोरे,शंकर बाबा,शाखाप्रमुख-यश उपाध्ये,उपशाखाप्रमुख-सागर बडगुजर,शाखा संघटक-पंकज व्यास,सचिव-सागर उपाध्ये यांच्यासह उत्तम शिंदे,सतीश बिरारी,साबळे काका,श्रीकांत आगळे,गणेश सोनवणे,कामील भाई, भरत कोचुरे, सुमित पंडित, आदित्य कोळी, रामदेव उपाध्ये,खलील भाई, यांच्यासह शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here