श्रीराम विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत

shreeram-vidyalaya-jalgaon

जळगाव (कार्यकारी संपादक समाधान पाटील) । येथील श्रीराम तरुण मित्र मंडळ संचलित श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीरामाच्या व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे सचिव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.संस्थेचे संचालक वासुदेवभाऊ सानप यांचे तसेच श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक ईश्वरी ईखे व दिवाकर सदाशिव जोशी यांचेदेखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

 

विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करून तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन करण्यात आले. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका श्रीमती राजश्री तायडे यांनी केले, सूत्रसंचालन करताना विद्यार्थ्यांनी पुस्तकांची काळजी कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here