मुंबई (संपादक सुनिल पाटील) । बुधवारी (दि.१४ जून) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डधारक आर के एचआयव्ही एड्स संशोधन आणि काळजी केंद्र आयोजित टीबी मुक्त आरोग्य शिबिराचे एसबीआय फाऊंडेशनच्या सहाय्याने अमरोली सूरत येथे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून एसबीआय फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक संजय प्रकाश आणि एसबीआयचे व्यवस्थापक राजा राम उपस्थित होते. या शिबिराचा ४९ हजार रुग्णांनी लाभ घेतला.
शिबिरात रुग्णांवर उपचार करुन, त्यांना प्रतिबंधात्मक औषधांसह, व्हीलचेअर, चष्मे, औषधांचे वाटप करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ३४ हून अधिक डॉक्टरांनी परिश्रम घेतले.








