पारोळा (प्रतिनिधी डॉ.दिपक पाटील) । येथील मौलाना व कुरेशी यांनी बकरी ईदच्या दिवशी आषाढी एकादशी आलेने कुर्बानी देणार नसल्याचे आश्वासन दिले. आज शुक्रवारी पारोळा पोलीस स्टेशन येथे आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी या सणांच्या अनुषंगाने पो स्टे हद्दीतील कुरेशी /खाटीक समाजाची व मस्जिद प्रमुख ,मौलाना यांची बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीस शमशोद्दीन मौलान, अजीज
मोहम्मद मन्सुरी, शेख जुबेर शेख गफ्फार,
शेख नुरुद्दीन शेख अल्लाउद्दीन, सिकंदरखान
बाबेखान पठाण, मोहम्मद पठाण,
मौलाना युसूफ नुरमोहम्मद, हाजी युसुफ,
जुबेर अहमद शेख मोहम्मद खाटीक असे
बैठकिस उपस्थित होते.तसेच पारोळा येथील
पंचायत समिती हॉल येथे तालुक्यातील
सर्व पोलीस पाटील,सरपंच व उपसरपंच,
महिला दक्षता कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली होती.
उपस्थित लोकांना कोणत्याही घटनांमुळे सामाजिक/ धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार
नाही याची दक्षता घ्यावी व शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे कुठलेही गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करण्यास सक्त मनाई असुन कोणीही कोणत्याही समाजाच्या/ धर्माच्या भावना दुखावतील असे कॄत्य करणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या असता उपस्थित कुरेशी,मौलाना व प्रतिष्ठीत मुस्लिम मान्यवरांनी बकरी ईद चे दिवशी हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशी येत असलेने कुर्बानी कोणीही देऊ नये म्हणून उपस्थितांना आश्वासन दिले. तसेच कोणताही कायदा व सुव्यवसस्थेचा प्रश्न होणार नाही,पोलिसांना सहकार्य करू असेही आश्वासन दिले असून मिटींगला CRPC 149 प्रमाणे नोटिस बजावण्यात आलेल्या आहेत.बैठकीला डीवायएसपी सुनील नंदवाळकर,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी मार्गदर्शन केले आहे.







