ओन्ली समाजसेवा संस्थेच्यावतीने वारकऱ्यांना चहा व नाष्टा वाटप

warkari-nasta

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) । वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव महाराज मोरे पायदळ दिंडी सोहळा २०२३ यांना ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्याकडून वारकऱ्यांना चहा व नाष्टाची व्यवस्था करण्यात आली होती.

 

 

या दिंडीसाठी चहा नाष्ट्याची ही परंपरा ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्यातर्फे वर्षानुवर्षांपासून सुरु आहे. या दिंडीत १४० ते १५० वारकरी सहभागी झाले होते.

 

 

याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व महिला सदस्य उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दिल्याबद्दल ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी सर्वांचे आभार मानले.

 

only-samjseva-barshi only-samajseva

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here