मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – शिवसेना चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली,
वाढीव लाईट बिल विरोधात अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालय, टिळकनगर, चेंबूर येथे गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२० रोजी, सकाळी ११.३० वाजता धडक निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान वाढीव लाईट बिलाचा जाहीर निषेध करत वाढीव लाईट बिलांची होळी करण्यात आली.
ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या समवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांची गाऱ्हाणी, तक्रारी ऐकून शंकांचे निरसन करण्यासाठी विभागवार बैठकीचे आयोजन करण्याचे असा ठराव मंजूर करण्यात आला होता.
यावेळी निवेदन देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात वीज मीटर रिडींग न घेता वाढीव/ भरमसाट मोघम पद्धतीने आकारणी केलेले लाईट बिल कमी करण्याची मागणी आमदार दिलीप लांडे यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकारी यांना केली. या आंदोलनात आमदार लांडे यांच्यासह उपविभाग प्रमुख अशोक माटेकर, नगरसेवक किरण लांडगे, विजयेंद्र शिंदे, माजी नगरसेवक, ईश्वर तायडे, उपविभाग संघटिका जोत्सना दळवी, शाखाप्रमुख अनंत उत्तकेर, बाळकृष्ण गटे, शैलेंद्र निंबाळकर, नितीन गोखले, शाखा संघटिका धनश्री पवार, श्वेता मसुरकर, पार्वती शिंदे तसेच विजय वारे, बाळासाहेब शिदे, प्रयाग लांडे, नितीन गायकवाड, आकाश शिदे, संदेश बाडागळे, शिवा पाणिग्राही आदी शिवसैनिक उपस्थित होते.








