पुणे (क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) । रुपीनगर-तळवडे येथील मोरया मेडिकल या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव, मणेश भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड रक्तपेढी व चाकण रक्तपेढी यांच्या सहयोगातून दिनांक २५/६/२०२३ रोजी बारा तासाचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.जोरदार पाऊस असताना देखील सामाजिक सामाजिक भान राखत एकुण १४२ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
प्रथम सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे राजेशभाऊ नलगे यांनी आजवर ७४ वेळा रक्तदान केले.नागनाथ मस्के यांनी ६७ वेळा रक्तदान केले आहे अशा रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच या परिसरातील रक्तदान ग्रुपला मेसेज अथवा माहिती मिळाल्यास लगेच सजगता दाखविणारे रामदास भोसले यांनी कोरोना कठीण काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक वेळा प्लाझ्मा दान केला.तुकाराम पाटील,दत्तात्रय खरे,नूर शेख,सुहास तापकीर यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.पिंपरी चिंचवड शहरांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के व अशोक कोकणे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रामुख्याने या परिसरातील सर्वपक्षीय माजी नगरसेवक,शिक्षण मंडळाचे माजी सभापती,शिक्षण मंडळाचे सचिव तसेच युवा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख OSD मंगेश चिवटे यांनी फोनच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. पश्चिम महाराष्ट्र प्रसार प्रसिद्धी प्रमुख आरोग्यमित्र राजाभाऊ भिलारे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. बरकत मुजावर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ मुंडे,भारतीय टेक्निकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे,ज्ञानदीप विद्यालयाचे माजी प्राचार्य सूर्यकांत भसे, रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक वसंत पतंगे, अध्यक्ष कॅप्टन अशोक कदम, घारजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
बळीराम जाधव,शिरीषभाऊ उत्तेकर,राहुलदादा पिंगळे,जमीर मुल्ला ,मोरया मेडिकलचे मालक किशोरभाऊ शिंदे तसेच सर्व कार्यकर्ते व सभासद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या अनुषंगाने शिवसंवादच्या माध्यमातून आज एका दिव्यांग मुलीला तिच्या एमपीएससीच्या शिक्षणासाठी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सहदेव नाकाडे यांच्या कुटुंबीयातर्फे तीला आर्थिक मदत केली.तीच्या शिक्षणाचा खर्च नाकाडे परिवार करणार आहेत. त्याचबरोबर शिवसंवादच्या माध्यमातू आई-वडील नसणाऱ्या दोन मुलांचा खर्च शिवसंवाद संस्था करणार आहे. गौतम दळवी सर यांनी कार्यकमाचे अतिशय सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन केले.सर्व रक्तदात्यांचे जनसेवक संदीप जाधव आणि मणेश भालेकर यांनी आभार व्यक्त केले.







