मुंबई (क्राइम रिपोर्टर करिश्मा दळवी) । शिवसेना चित्रपट शाखा मुंबई सचिव दिलीप दळवी यांचा जन्मदिवस वेस्टर्न इंडिया फिल्म ॲण्ड टी.व्ही. प्रोड्यूसर असोशिएशनतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बोलतांना वेस्टर्न इंडिया फिल्म ॲण्ड टी.व्ही. प्रोड्यूसर असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम शिर्के म्हणाले की, एक माणूस निस्वार्थीपणें किती काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिलीप दळवी. आज ३० पेक्षा जास्त युनियनचा दिलीप पदाधिकारी आहे. मी गेली ४० वर्ष दिलीप बरोबर आहे. मी करत असलेल्या बालनाटयचा निर्मितीचा सूत्रधार दिलीप होता. आज वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्यूसर असोसिएशनसारखी एक नामांकित संघटना तो सांभाळतो आहे. अश्या ३० च्या वर संघटनान चा कार्य भार तोंसमर्थपणे सांभाळतो आहे. महाराष्ट्रातच नाही तर युपीमध्येही वेस्टर्न इंडियाच कार्यालय सुरू करण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, इंडस्ट्रीमध्ये कोणाचे पैसे जर निर्मात्याने दिले नाहीत तर एका फोन वर पैसे मिळवून
देण्याची ताकद दिलीप कडे आहे. कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री मधली समस्या दिलीप सहज सोडवतो ते ही अगदी प्रेमाने. आज काही संस्था ओळखपत्र देण्यासाठी सहा महिने लावतात तिथे दिलीप ज्या संस्थेत आहे त्या संस्थेच कार्ड जास्तीत जास्त ४ दिवसात मिळत. दिलीप एक चांगला संघटक तर आहेच पण एक मित्र एक माणूस म्हणून ग्रेट आहे.वेस्टर्न इंडिया फिल्म ॲण्ड टी.व्ही. प्रोड्यूसर असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम शिर्के यांच्या कार्यालयात हा जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वेस्टर्न इंडिया फिल्म ॲण्ड टी.व्ही. प्रोड्यूसरचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.







