धसई येथे पुरलेल्या मृतदेहाचा झाला उलगडा

dasai-police

मुंबई (उपसंपादक प्रफुल्ल शेलार) । ११ जूनला शिवनेर फर्डेपाडा गावचे हद्दीत एक अनोळखी इसमाचे प्रेत जमिनित पुरलेल्या स्थितीत असल्याबाबत प्रभाकर खंडु फडे (रा. धसई, पोलीस पाटील) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यावरून शहापूर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, पोलीस स्टाफ व नायब तहसिलदार एस. जी. घुटे यांचेसह घटनास्थळी गेले.

 

 

पुरलेला मृतदेह नायब तहसिलदार यांचे समक्ष जमिनीतुन बाहेर काढण्यात आला. त्यावरुन शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु नोंद क्र. ५८/२०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल केला आला. त्यानंतर मयताचे अंगावरील शर्ट व हातामधिल दोन अंगठ्या यावरुन शहापूर पोलीसांनी दि. १२/०६/२०२३ रोजी एका दिवसातच मयताची ओळख पटवून सदरचा मृतदेह गोपाळ रंगय्या नायडू, (रा. टिटवाळा) यांचा असल्याचे निष्पन्न केले.

 

मृतदेहावर उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे पोस्टमॉर्टम करण्यात आले असुन त्यामध्ये मयताचा गळा धारदार शस्त्राने कापून खुन केला असल्याचे निष्पन्न झालेवरुन दि. १५/०६/२०२३ रोजी शहापूर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्र. २०५/२०२३ भादवि कलम ३०२, २०१. ३४ प्रमाणे दाखल केला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अरुण जगन्नाथ फडे रा. धसई, सोमनाथ जाधव, रा. टायरीपाडा कल्याण यांना स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांनी संमातर तपास करून ताब्यात दिले.

 

या गुन्ह्यामध्ये आणखीन आरोपी नामे १) गणेश बाजीराव खंडागळे वय ४२ वर्ष रा. रुम नंबर १७४, तळमजला, हरीओम अपार्टमेंट, गोल्डन पार्कजवळ, तानाजीनगर, कल्याण पुर्व ता. कल्याण जि.ठाणे २) नारायण तुकाराम भोईर वय ५४ वर्ष रा. भुवनगांव मुरबाड ता.मुरबाड जि.ठाणे ३) जयेश भारकर फर्डे, वय ३० वर्षे, रा. धसई, ता. शहापूर, जि ठाणे यांचा सहभाग निश्चित झाल्याने त्यांना देखिल अटक केली आहे. तसेच मुख्य आरोपी रमेश मोरे हा फरारी आहे.

या घटनेबाबत अटक आरोपी अरुण फर्डे आणी सोमनाथ जाधव यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी आरोपी रमेश मोरे याचेकडे मयत गोपाळ नायडु याचे पैसे होते. ते पैसे परत मिळवण्यासाठी मयताने तगादा लावला होता. त्यावरुन रमेश मोरे याने त्यास मारण्याचा कट रचला व त्यानंतर त्यास दि. ०३/०६/२०२३ रोजी विषारी सर्पाने दंश देवून चाकुने गळा कापुन जिवे ठार मारले व त्यानंतर आरोपी अरुण फर्डे याचेच शेतामध्ये पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने फुरले. सदर गुन्ह्याबाबत अटक आरोपी यांचेकडे सखोल तपास करीत असताना त्यांनी अशाच प्रकारे पडघा पोलीस ठाण्याचे हद्दीतील इसम नामे बाळु शंकर पाटील वय ७१ वर्षे, रा. चिंचवली पो. वडपे, ता. भिवंडी जि.ठाणे यांना सर्पदंश देवुन जिवे ठार मारले बाबत कबुली दिलेली आहे. त्यावरून पडघा पोलीस ठाणे यांना रिपोर्ट देण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक ठाणे ग्रा., दिपाली घाटे, अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, मिलींद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी, सुरेश मनोरे पोलीस निरीक्षक स्थागुशा, राजकुमार उपासे प्रभारी पोलीस निरीक्षक शहापूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी आर. आर. केंद्रे, पोउपनिरी कमलाकर मुंढे, पोहया शशीकांत पाटील, पोना विकास सानप, पोना अनिल राठोड, पोशि दत्तात्रय भोईर, पोशि रमेश नलावडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here