पहुर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी सचिन सानप

pi sachin-sanap

जळगाव (कार्यकारी संपादक समाधान पाटील) । जिल्ह्यातील पहूर येथील पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांची जालना येथे बदली झाली असून, त्यांनी रविवारी पदभार सोडला. त्यांच्या जागेचा पदभार छत्रपती संभाजीनगरातील पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी स्वीकारला आहे.

 

 

सचिन सानप यांची सन २००६ मध्ये पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. यानंतर नगर, श्रीगोंदा, सोनई तसेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा, वरणगाव येथे त्यांनी कर्तव्य बजावले आहे. पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील बेगमपुरा, वेदांतनगर या पोलीस ठाण्याची धुरा सांभाळली होती. आता छत्रपती संभाजीनगरातून त्यांची जळगाव जिल्ह्यातील पहुर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे.

 

 

जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्याअंतर्गत जागोजागी अवैध धंदे बोकाळले आहेत. तसेच जांभूळ गावच्या व्यक्तीच्या खून प्रकरणी त्याचा मृतदेह शोधण्याचे मोठे दिव्य आव्हान सचिन सानप यांच्यासमोर आहे. जळगाव ते औरंगाबाद रस्त्यावरील महत्त्वाच्या गावांपैकी पहूर हे असल्यामुळे तेथे कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम सहकाऱ्यांच्या मदतीने कायम ठेवण्याचे आव्हान सानप यांच्यापुढे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here