बार्शीतील गणेश कदम यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहु महाराज गौरव पुरस्कार

rajshree-shahu-maharaj-purskar

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) । अविष्कार फाउंडेशन कोल्हापुर ही संस्था गेली १८ वर्ष कार्य करत आहे .त्यांनी समाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेञात काम करत असलेल्या लोकांना शबासकी थाप देवुन त्यांना प्रेरणा देत असते.

 

कोल्हापूर शहरात मानाचा राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहु महाराज गौरव पुरस्कार बार्शी शहरातील संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेचे सहशिक्षक व ओन्ली समाज सेवेचे सदस्य मा.श्री गणेश कदम यांना २५ जून या दिवशी मिळाला हा पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्व जिल्हा मधुन सर्वानी सहभाग नोंदवला होता यात ८५ लोकांना सामाजिक व शैक्षणिक क्षेञात कार्य करत असलेल्या लोकांना निवडले त्यांना पूरस्कार दिले गेले. दि २५ जुन रोजी डाॅ व्ही टी पाटील सभागृह राजारामपुरी कोल्हापुर येथे मान्यवरांच्या हस्ते मानपञ देवुन सन्मानचिन्ह देवुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे सत्कार स्वीकारल्यावर गणेश कदम सर यांनी सांगीतले.

 

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना ओन्ली समाज सेवा बहुउद्देशिय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी , पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले.तसेच भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक संतोष गुळमिरे सर आणी शिक्षकांनी अभिनंदन केले असे गणेश कदम सर यांनी सांगीतले व हा पुरस्कार त्यांनी त्यांच्या कूटुंबाला अर्पण करत आहे असे त्यांनी शेवटी सांगीतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here