ठाणे (क्राइम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वनम) । दिनांक १९/०६/२०२३ रोजी गुन्हे शाखा घटक -२ भिवंडी नेमणुकीतील पोलीस अधिकारी व अंमलदार असे गुन्हेगार वॉच करणेसह आणि हायवे रॉबरी चोरीस प्रतिबंध करणेसाठी भिवंडी परिमंडळ – २ परिसरात पेट्रोलींग फिरत असताना, साईबाबा मंदिरासमोरील रोडवर कल्याण बाजुकडून भिवंडी बाजुकडे जाणाऱ्या रोडवरून काळया रंगाचे पल्सर मोटार सायकलवरून संशयास्पदरित्या भरधाव वेगात जाणाऱ्या, मोहझम नवाज शरीफ अन्सारी वय २८ वर्षे, राहणार पिराणीपाडा, रूम नं. ५४१, बावडीजवळ, शांतीनगर रोड भिवंडी आणि नियाज अहमद हुसेन शेख वय ३२ वर्षे, राहणार ताहिर कॉम्प्लेक्स पहिला मजला, सलाऊद्दीन स्कुलचे पाठीमागे, पिराणीपाडा शांतीनगर भिवंडी यांना संशयावरून ताब्यात घेतले होते.
त्यानंतर भिवंडी गुन्हे शाखा घटक – २ भिवंडी मधील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचेकडे कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास केल्यावर त्यांनी त्यांचे साथीदारांसह भिवंडी शहरात केलेल्या गुन्हयांची कबुली दिल्यावर त्यांना सर्वप्रथम भोईवाडा पो.स्टे. भिवंडी गु. रजि. क्र. ६८/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ३९२, ३४ या गुन्हयात १७.०० वा. अटक करून, त्यांना मा. न्यायालयात हजर करून त्याची २६/०६/२०२३ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याचेकडे कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास केला.
आरोपी मोहझम नवाज शरीफ अन्सारी आणि नियाज अहमद हुसेन शेख यांचेकडून भिवंडी परिमंडळ – २ मधील वरिलप्रमाणे १२ गुन्हयांसह भिवंडी तालुका पो.स्टे. येथे दाखल असलेले २ गुन्हे असे एकुण १४ गुन्हे उघडकीस आणुन त्याचेकडून एकुण २६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व इतर ऐवज असा एकुण १३,००,०००/-रू. किंमतीचा ऐवज हस्तगत केलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा घटक – २ भिवंडी कडून करण्यात येत असून, अटक केलेल्या दोन्ही आरोपींचे साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
सदरची कामगिरी जयजीत सिंह पोलीस आयुक्त, ठाणे, दत्ता कराळे, पोलीस सह आयुक्त, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, ठाणे, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे ठाणे, निलेश सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध- १ गुन्हे शाखा ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली, सचिन गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा घटक -२ भिवंडी, स. पो. नि. विजय मोरे, स. पो. नि. प्रफुल्ल जाधव, स.पो.नि. धनराज केदार, पो.उप.निरी राजेंद्र चौधरी, निसार तडवी, स. पो.उ.नि. रामचंद्र जाधव, रविद्र पाटील, राजेश शिंदे, पोहवा / मंगेश शिर्के, साबीर शेख, रंगनाथ पाटील, सुनिल साळुखे, शशिकांत यादव, प्रकाश पाटील, देवानंद पाटील, किशोर थोरात, पो.ना. सचिन जाधव, पो.शि. सचिन सोनवणे, पो., पो.शि.अमोल इंगळे, पो. शि. जालींदर साळुंखे, पो.शि. रोशन जाधव, पो.शि. प्रशांत बर्वे, पो.शि. भावेश घरत आणि म.पो. हवा. / माया डोंगरे, श्रेया खताळ यांनी केलेली आहे.







