सुसाईड नोट लिहून उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या

dead-body
file photo

जळगाव (कार्यकारी संपादक समाधान पाटील) । शहरातील रौनक कॉलनीतील कोमल वसंत भावसार (वय ३०) या उच्चशिक्षित तरुणीनं घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून पोलिसांनी कोमलच्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये सुसाईट नोट आढळून आली आहे. पोलिसांनी लॅपटॉप आणि सुसाईड नोट जप्त केली आहे.

 

शहरातील रौनक कॉलनीत कोमल भावसार ही वास्तव्यास असून ती बँकेत अकाऊंटन म्हणून नोकरीला होती. दरम्यान, कोमलचे आई आणि भाऊ पुण्यात गेले आहे तर वडील कंपनीत कामाला जातात. कोमल बँकेत कामाला जाणार होती. मात्र वडील कामावर जाताच कोमल भावसारने आत्महत्या केली.

 

सायंकाळी तीचे वडील कामावरुन घरी परतले असता, त्यांना आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिसांना कोमलच्या लॅपटॉप बॅगमध्ये सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात मम्मी पप्पा सॉरी, मी स्वतःच आत्महत्या करीत आहे. कुणालाही जबाबदार धरू नये. अशा आशयाचा मजकूर चिट्ठीत मांडल्याचे दिसून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here