संचारबंदी काळात केलेल्या कामांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून नवनिर्माण संस्थेमार्फत गौरव

स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम संपन्न
दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील नवनिर्माण संस्था गेल्या वीस वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यात ग्राम आरोग्य शिक्षण आदी विषयांवर काम करत आहे covid-19 संचार बंदी काळातदेखील संस्थेने विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तीन हजार कुटुंबांना रेशन कीट आरोग्यसेवा पुरविल्या असून covid19 मध्ये केलेल्या कामाची सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रशासकीय अधिकारी स्वयंसेवी संस्था यांचा सत्कार व्हावा आणि कारण कोरोना युद्ध अद्यापही संपलेली नसून त्यात त्यांना काम करण्याऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन ऊर्जा मिळवी या उद्देशाने नवनिर्माण संस्थेने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हॉटेल डीएसके सभागृह येथे मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात उपजिल्हाधिकारी श्री कैलास कडलग समाज कल्याण अधिकारी नवापूर अशोक पटाईत गट विकास अधिकारी नवापूर नंदकुमार वाळेकर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री वसंत बोरसे नंदुरबार जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री नितिन मंडलिक श्री सप्तशृंगी संस्थेचे अध्यक्षा मिना ताई भोसले श्री विश्वास सूर्यवंशी नवनिर्माण संस्थेचे मार्गदर्शक डॉ.माधव कदम ,श्री कैलास लोहार पी एम पाटील नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात NBC ग्रुप चे प्रमूख श्री आनंद जैन हस्ती परिवार दोंडाईचे श्री कैलास जैन यांनी सदर कार्यक्रमाला मदत केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनिर्माण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री संजय वळवी समुपदेशक शीतल शक्य समीर वळवी दिलीप पावरा हेमंत पगारे हेमंत मंडलिक निशा न्याहलदे आदींनी परिश्रम घेतले एकूण नंदुरबार जिल्ह्यातील 172 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here